भिवपुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता बोडके यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर
कर्जत : भिवपुरी ग्रामपंचायतीच्या शिवसेनेच्या सरपंच अनिता आण्णा बोडके यांच्यावर त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध भाजपच्या भिवपुरी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या .स्मृती शशिकांत पै आणि वैशाली विलास नवले यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी भिवपुरी ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत कर्जत तहसिलचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सरपंच यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव मतदान प्रक्रियानुसार हात वर करून घेतल्याने एक विरुद्ध सहा असा निर्णय झाल्याने सभेचे अध्यक्ष तथा तहसिलदार अविनाश कोष्टी यांनी अविश्वास ठरावाला सर्वांसमक्ष मंजुरी दिली.
कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायतची निवडणूक २८ आक्टोंबर २०१५ रोजी झाल्यानंतर ४नोव्हेंबर २०१५ रोजी शिवसेनेच्या अनिता आण्णा बोडके यांनी सरपंच म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यानंतर मात्र, त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमधील सहकार्यांना विश्वासात न घेताच मनमानी कारभार सुरु केल्याने अखेर त्याच ग्रामपंचायतमधील .स्मृती शशिकांत पै, वैशाली विलास नवले, .आशा मनोज ढाकवळ, हेमा सखाराम वाघमारे, रमेश कमळू पवार आणि स्वप्निल भगवान भोसले या सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता.
अविश्वास ठरावासंदर्भात निर्णय ऐकण्यासाठी भिवपुरी ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार देवेंद्र साटम, किसान मोर्चा प्रदेश चिठणिस सुनिल गोगटे, प्रज्ञा प्रकोष्टचे अध्यक्ष नितीन कांदळगावकर, रायगड जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अशोक गायकर, माजी जिल्हा चिठणिस रमेश मुंढे, सोशल मिडिया सेलचे रायगड जिल्हा सहसंयोजक विलास श्रीखंडे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर, अल्पसंख्याक सेलचे उपाध्याक्ष अब्दुल नजे, तालुकाध्याक्ष दिपक बेहेरे, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पिंपरकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा कल्पना दास्ताने, तालुकाध्याक्षा सुगंधा भोसले, नगरसेविका बिनिता घुमरे, अनुसुचित जमातीचे पवार, अनिल ठाणगे, स्वप्निल खंबाले, विजय कुलकर्णी, महेश घाडगे, संतोष घाडगे, विजय लोहट, अंकुश मुने, दिनेश घाडगे, शशिकांत पै, राजेंद्र जाधव, विलास थोरवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.