थालासिमियाग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवली धावली ..

डोंबिवली :  थालासिमिया जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट आणि कल्याण डोंबिवली रनर्स या संस्थाच्या माध्यमाने रविवारी  *रन फॉर थालासेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन पार पडली. यावेळी 1200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्यूण्यामुळे आनुवंशिकतेतून पुढे जाणा-या थालासिमिया या रक्तविकाराला आटोक्यात आणण्याचा चंग रोटरी परिवाराने बांधला आहे. त्याच उद्दीष्टाने थालासेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकूल येथून संपन्न झालेल्या ५ कि.मी. व १० कि.मी. अशा दोन स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला आमदार रविंद्र चव्हाण व रोटरीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर बक्षिस समारंभाला शिवसेनेचे रमेश  सुकऱ्या म्हात्रे उपस्थित होते.

थालासेमिया प्रिव्हेंशन मोहीम यंदाचा थ्रस्ट एरिया असल्याचं रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी.शिवराज यांनी ठिकठिकाणच्या उपक्रमांमध्ये स्पष्ट केले आहे. थालासिमिया या विकाराबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर जागरूकता निर्माण करणे आणि बाधित रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दिलासा देणे हे आमचे उद्दीष्ट असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी दिली. काही वर्षांच्या कालावधीत थालासिमिया या विकाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

डोंबिवली प्राइड धावण्याच्या स्पर्धेत ज्ञानेश्वर मोरगाने १०कि.मी हे अंतर ३३.०६ मिनिटांत पूर्ण करून पहीला नंबर पटकावला व उदेसिंग पाडवीने हेच अंतर ३४.०९ मिनिटांत पूर्ण करून दुसरा नंबर पटकावला तर महीलान मध्ये कविता भोईर ने हे अंतर ४४ मिनिटांत पूर्ण करून पहीला नंबर पटकावला तिघेही विक्रमगड येथून येवून वनवासी कल्याण आश्रमाचे प्रतिनिधित्व करत होते. तब्बल १२०० स्पर्धकांच्या सहभागाने रंगलेल्या या मॅरॉथॉनचे संयोजन रनबर्न या संस्थेने केले होते.१० किमी अंतरासाठी ५७७ आणि ५ किमी साठी ७२३ स्त्रीपुरुष या स्पर्धेत उतरले होते.

* विजयी स्पर्धक *.

*खुला गट १० कि.मी.*
*पुरुष*
१. ज्ञानेश्वर मोर्गा (३३.०९ मि)
२.उदेसिंग पगली (३४.०६ मि )
३. जगदिश गावडे (३६.४४ मि )
*महिला*
१. कविता भोईर (४४.१८ मि )
२. दिव्या पडवी ( ४६.५९ मि)
३. पूजा पडवी ( ४७.४६ मि)

*४५ वर्षावरील गट*
*पुरुष*
१. उपेंद्र प्रभू
२. अशोक भारोवा
३. दिपक सोनी

*महिला*
१. सुनिता टिक्कू
२. मृणाल कुलकर्णी
३. शकुंतला वाघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!