मनसेतर्फे मराठी ग्रंथालय चालवणाऱ्या संस्थांचा सन्मान
डोंबिवली ; मराठी भाषा दिनानिमित्त मनसे जनहित कक्षातर्फे शहरातील मराठी ग्रंथालय चालवणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला.यात आचार्य प्र.के.अत्रे ग्रंथालय चालवणाऱ्या गणेश मंदिर संस्थानच्या सौ राव मैडम तसेच फ्रेंड्स लाइब्रेरी चे पै साहेब,आस्वाद ग्रंथालय,स्वामी ग्रंथालय यांचा समावेश होता.
डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली स्थानक परिसरात तसेच ग्रामदैवत गणेश मंदीरासमोर तसेच शहरातील प्रमुख चौकात देखील मोठमोठया रांगोळ्या काढण्यात आल्या . महिला शहर अध्यक्ष्या मंदा ताई पाटिल यांच्या पुढाकारने पाथर्ली प्रभागात व डोंबिवली स्थानकात मराठी स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. डोंबिवली शहरातील तब्बल 50 विद्यालयांना मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांची प्रतिमा भेट देण्यात आली. अशी माहिती जनहित चे ओम लोके यांनी दिली. या प्रसंगी मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत,जिल्हा सचिव प्रकाश माने,उपजिल्हा सचिव नीलेश भोसले,शहर संघटक संजीव ताम्हाणे,दीपक शिंदे,निषाद पाटिल,प्रितेश पाटिल,रविंद्र गरुड़,राजेंद्र चौगुले,प्रतिभा पाटिल,स्मिता भणगे तसेच मनसे सहकारी उपस्थित होते.