स्मशानभूमीत काव्य संग्रहाच प्रकाशन करून सरकारचा निषेध…
डोंबिवली:- एकिकडे राज्यभर जागो जागी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असतानाच, दुसरीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व मराठी भाषा जोपासण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा समारोप डोंबिवली येथील शिवमंदिर वैकुंठ स्मशानभूमीत पार पडला. याठिकाणी साहित्यिक सुरेश देशपांडे,राजाराम काळभोर ,जयंत भावे आदि उपस्थित होते. यावेळी जयप्रकाश घुमटकर यांनी ‘टवाळकी स्मशानाच्या दारात’ या काव्य संग्रहाच प्रकाशन केले. यावेळी घुमटकर यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. प्रत्येक राज्यात प्रादेशिक भाषांना संधी दिली जाते.तेथे अनिवार्य केले जातात मात्र आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य का केली जात नाही अशी नाराजी घुमटकर यांनी व्यक्त केली. मुले इंग्रजी शाळेत शिकायला जातात म्हणून नावे ठेवतात. इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेच्या शाळेत एक भाषा मराठी भाषा अनिर्वार्य विषय करावी अशी सरकारला विनंती करीत आहोत.तसेच राज्यपालांच्या अभिभाषण वेळी मराठी अनुवादच झाला नाही हा विषय साहित्यिकांनी चव्हाट्यावर आणावा असे हि आवाहन घुमटकर यांनी केले.