बारवी धरणात जूलैपर्यंत पुरेल इतका पाणी साठा
ठाणे जिल्हयात पाणी टंचाईची शक्यता कमी ?

डोंबिवली : ठाणे जिल्हयाला पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात जूलैपर्यंत पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी दमदार पाऊस पडल्याने धरणात पाणी साठा आहे. त्यामुळे यंदा ठाणे जिल्हयात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता कमी असल्याची माहिती एका अधिका- याने सांगितली.  डोंबिवली पत्रकार संघाने बारवी धरणाला भेट दिली त्यावेळी एका अधिका-याने अनौपचारीकपणे बोलताना ही शक्यता व्यक्त केली. सध्या १५ दिवसातून एकदा पाणी कपात केली जाते. त्यानुसारच जूलैपर्यंतचे नियोजन करण्यात आलय. जून-जूलैपर्यंत पावसाची सुरूवात होणार असल्याने आणखी पाणी कपात करण्याची गरज उरणार नाही. मात्र पाणी कपातीचा निर्णय हा लघु पाटबंधारे विभागाकडून घेतला जातो.

    ११ स्वयंचलित दरवाजे
बारवी धरणात पाणीसाठा वाढणार असून, यासाठी ११ गोडबोले (वक्र) पध्दतीचे दरवाजे बसवण्यात आले आहे. धरणाच्या मद्यभागी ८०० मी लांबीचा बांध दगडाने बांधण्यात आला असून त्याच्या वरील ठिकाणी गोडबोले (वक्र ) दरवाजे बसवण्यात आले आहेत. धरणाचे तिस़-या टप्प्याचे बांधकाम सांडव्यापर्यंत येऊन थांबले असून ६८.६० मीटर वर स्वयंचलित दरवाजे बसण्यात आले आहेत. नॉन ओव्हर फ्लो विभागाची उची वाढवण्याचे काम ६५ मीटरपर्यत पूर्ण झाले आहे.सध्या हे वक्र दरवाजे उघडे करुन ठेवण्यात आले आहेत.

         पूनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात
बारवी धरणाची उंची वाढवण्यासाठी पाच गावातील सुमारे ७६५ कुटुंबांचे पनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तोंडली, मोहघर, काचकोळी, सुकाळवाडी, कोळेवडखळ, मानिवली व इतर पाच पाडे यथील सुमारे ७६५ कुटुंबियांचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास अधिका- याने व्यक्त केला.

बारवी धरणावर वीज निर्मिती
महामंडळाने बारवी धरणावर पाच मेगा वेट क्षमतेच्या जल विद्युत केंद्र उभारण्यास खासगी तत्वावर परवानगी दिलीय. वीज निर्मितीपासून महामंडळाची सुमारे ६ कोटी रुपयांची बचत होणार आहे. संपूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर म्हणजे ३४०.४८दशलक्ष घनमीटर इतका साठा झाल्यानंतर वीज निर्मिती सुर होणार असल्याचे सांगण्यात आले. अजून पुनर्वसनाचे काम शिल्लक असल्याने यंदाही धरणात पाणीसाठा ६८.६० दशलक्षघन मीटर इतका होणार आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *