बहुचर्चित रस्ते घोटाळयात मुंबई महापालिकेचे १८० अभियंते दोषी ; सहाजणांना सेवेतून बडतर्फ
मुंबई– मुंबई महापालिकेतील गेल्या दोन वर्षापासून गाजत असलेला बहुचर्चित रस्ता घोटाळयाची २३४ रस्त्यांचा अंतिम अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या चौकशीत १८० अभियंते दोषी ठरले आहेत. त्यापैकी सहा अभियंत्यांना पालिकेने थेट सेवेतून बडतर्फ केले असून, २३ जणांना पदावनत करण्यात आलयं. महापालिकेतील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे सांगितलं जातय.
मुंबईतील रस्त्यांच्या एकूण २३४ कामांमध्ये गैरव्यवहार झाला असून हा सुमारे ३५२ कोटीचा घोटाळा असल्याचे सांगितले जाते. रस्ते घोटाळयातील पहिल्या टप्यातील ३४ रस्त्यांबाबतचा चौकशी अहवाल काही दिवसांपूर्वीच जाहिर करण्यात आला होता. त्यावेळी १०० पैकी तब्बल ९६ अभियंते दोषी ठरले आहेत तर चार अभियंत्यांना बडतर्फ करण्यात आले होते. तसेच दोषींना पदावनती वेतनवाढ बंद रोख रकमेची दंडात्मक कारवाई अशा शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. ३४ रस्त्यांच्या चौकशीत रस्ते विभागाचे तत्कालीन चीफ इंजिनीअर अशोक पवार, दक्षता विभागाचे चीफ इंजिनीअर उदय मुरूडकर यांच्यासह सहा कंत्राटदार दोषी ठरले होते. पवार व मुरूडकर यांना सहा महिने तुरुंगवास झाल्यानंतर त्यांची यापूर्वीच जामिनावर सुटका झाली आहे. दुस-या टप्प्यातील २०० रस्त्यांच्या चौकशी अहवाल पूर्ण झाला. पहिल्या व दुस-या टप्प्यातील असा २३४ रस्त्यांचा चौकशी अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये १८५ अभियंत्यांची चौकशी करण्यात आली असून, केवळ पाच अभियंत्यांची निर्दोष मुक्तता झालीय.
————
काय होत प्रकरण
रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता असल्याची तक्रार तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केल्यानंतर 2015 मध्ये आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी आदेश दिले होते. त्यानुसार दोन वर्षापासून या घोटाळयाची चौकशी सुरू होती.
———-
शिक्षा सुनावलेले अधिकारी
– सेवेतून काढले : ६
– पदावनत / मूळ वेतनावर परत : २३
– निवृत्ती वेतनात कपात : ६
– ३ वर्षांसाठी कायम वेतनवाढ बंद : १३
– २ वर्षांसाठी कायम वेतनवाढ बंद : १७
– १ वर्षासाठी कायम वेतनवाढ बंद : ६७
– १ वर्षासाठी वेतनवाढ तात्पुरती बंद : ३१
– रोख दंड : १६
– ताकीद दिली : १
– दोष मुक्त : ५
———
हे अभियंते दोषमुक्त
उप मुख्य अभियंता ए. डी. माचीवाल, उपमुख्य अभियंता एस. एम. जाधव, सहायक अभियंता एस. एम. सोनावणे, दुय्यम अभियंता प्रशांत पालवे.
———-
हे आहेत दोष
० रस्त्यांची ढासळलेली गुणवत्ता
० कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे साहित्याचा वापर
० रस्त्यांच्या डेब्रिज वाहतुकीत गैरव्यवहार
0 गुणवत्ता तपासणीची जबाबदारी असलेल्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांशी संगनमत