मुख्यमंत्री-पालकमंत्री साहेब.., कल्याण डोंबिवलीकरांचा मालमत्ता कर कमी करण्यासाठी तत्परता दाखवाल का ?

डोंबिवली/ संतोष गायकवाड : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यात आल्याने, सामान्यांचा मालमत्ता कराचा प्रश्न चांगलाच चव्हाटयावर आलाय. बिल्डरांसाठी ग्रीन कारपेट आणि सामान्य जनतेकडे पाठ असा सूर शहरात पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मालमत्ता कराचा दर कमी करण्यासाठी तत्परता दाखवाल का ? असा सवाल आता कल्याण डोंबिवलीकर करीत आहेत.

ओपन लॅण्ड टॅक्स कमी करून बिल्डरधर्जिणा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद कल्याण डोंबिवलीत उमटले आहेत. पालिकेकडून सामान्यांसाठी आकारण्यात येणारा मालमत्ता कर ही सर्वाधिक ७३ टक्के आकारला जातो. ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यात आला मग मालमत्ता कर कमी का केला जात नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओपन लॅण्ड टॅक्सचा मुद्दा कॅबिनेटच्या बैठकीत उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत आणून दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्रयानीही कमी करण्यास सहमती दर्शविली होती. त्यानंतर ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून महासभेत आणून त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बिल्डरांसाठी पुढाकार घेणारे पालकमंत्री -मुख्यमंत्री आता सामान्य जनतेचा मालमत्ता कर कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन तेवढी तत्परता दाखवतील का ? असाच सवाल आता कल्याण डेांबिवलीकर उपस्थित करीत आहेत.
़़़़़़

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *