बारावीची परीक्षा आजपासून, बोर्डाकडून खबरदारी 
मुंबई : महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परिजश देत आहेत. मुंबई विभागातून ३ लाख ३० हजार ८२३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यंदाची परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी बोर्डातर्फे विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यंदा पासून पहिल्यांदाच उत्तरपत्रिका व पुरवण्याच्या प्रत्येक पानावर बारकोड छापण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकाचे गठ्ठे केंद्रप्रमुखाच्या कक्षात न फोडता थेट वर्गात नेले जाणार आहे.
शाखा      विद्यार्थी संख्या
कला         ५,८०,८२०
वाणिज्य     ४,७९,८६३
विज्ञान         ३,६६,७५६
व्होकेशनल।     ५७,६९३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *