लोडशेडींगचा निर्णय ऐन दिवाळीत महाराष्ट्र अंधारात
मुंबई : ऑक्टोबर हिटने जनता त्रस्त असतानाच महावितरण विभागानेराज्यात वीजभारनियमन लागू केले आहे. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला आहे त्यामुळे ऐन दिवाळी विजभारनियमनाचा फटका सहन करावा लागणार आहे.
कोळसा उपलब्ध नसल्याने आणि वीजेचा वापर वाढल्यामुळे वीजभारनियमनाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वीजेची मागणी साडे सतरा हजार मेगावॅट असताना, प्रत्यक्षात सोळा ते साडे सोळा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होते. राज्यात दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट असल्याने हा निर्णय घेतल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आल आहे. ऐन ऑक्टोबर हिटमध्ये हा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.