समाजसेविका काशीबाई जाधव यांना `आदर्श महिला रत्न` पुरस्कार प्रदान
डोंबिवली : जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने कोल्हापुरातील सामणी सभागृह येथे डोंबिवलीतील समाजसेविका काशीबाई जाधव यांचा राज्यस्तरीय `आदर्श महिला रत्न` पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले होते. काशीबाई जाधव यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे.महिलाच्या आत्महत्या , हुंडाबळी , दारूबंदी आदींमध्ये त्यांनी सामाजिक काम केलय.
समाजसेविका काशीबाई जाधव यांनी आजवर केलेल्या समाजकार्याचा अनेक सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार आणि सत्कार करून गौरविले आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या महिला आघाडीने काशीबाई जाधव यांचा सत्कार केला होता. अनेक राजकीय मंडळीनी जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पालिकेच्या शाळेत जाधव आणि काही महिलांनी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले होते. समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्दशाने नेहमी कार्यतत्पर असते असे काशीबाई जाधव यांनी सांगितले.महाशिवरात्रनिमित्त जय मल्हार महिला मंडळच्या वतीने अध्यक्षा काशीबाई जाधव , नगरसेविका मनीषा धात्रक ,रुपाली जाधव, साधना मडवी, सुरेखा टोपरे . लोचना पवार , विमल पुजारी , ताराबाई त्रिभुवन, मीनाक्षी शेनाॅय, लता नाटेकर या महिलांनी खिडकाळेश्वर मंदिरात भाविकांना खजूर आणि शेंगदाणे वाटप केले.