रायगडमध्ये मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालणार : रविंद्र चव्हाण

कर्जत : रायगडमध्ये अनेकांनी फक्त आणि फक्त विकासाच्या नावाखाली आश्वासने देण्याची कामे केलीत. मात्र यापुढं रायगडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालणार असून, पुढील काळात रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजप होणार या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केलीय असे प्रतिपादन रायगडचे नवे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गुरूवारी कर्जत येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.

राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच कर्जत येथे कोकण विभागाच्या विस्तारांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जत भाजपच्यावतीने चारफाटा येथे चव्हाण यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रायगडमध्ये आव्हान मोठी आहेत पण, भाजपाचा झंझावात थोपवण्याची ताकद रायगडमधील कुठल्याही विरोधी पक्षात नाही. कर्जतच्या आणि रायगडच्या विकासासाठी तुमच्या सर्वांची मोलाची साथ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत जाऊन शाश्वत डेव्हलपमेंट करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले, याप्रसंगी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, सरचिटणीस अविनाश कोली ,उपाध्यक्ष राजेंद्र येरुणकर, किसान मोर्चाचे सुनिल गोगटे, अशोक गायकर, नितिन कांदळगावकर, माजी चिठणिस रमेश मुंढे, सोशल मिडिया सेलचे जिल्हा सहसंयोजक विलास श्रीखंडे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर, तालुकाध्यक्ष दिपक बेहेरे,बापु घारे, राजेश भगत,सनि यादव, नगरसेवक अशोक ओसवाल,युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पिंपरकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, तालुकाध्यक्ष सुगंधा भोसले, राजाराम शेळके, माधव कोळंबे, संजय कराळे, स्वप्निल खंबाले, ब्बाँबी वाघमारे, विनायक पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *