एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेचा आज संताप माेर्चा : मोर्चेला पोलिसांची परवानगी नाही
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११.३० वाजता चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेचया मुख्यालयावर संताप मोर्चा काढण्यात येणार आहे. राज यांनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही तरीसुध्दा मोर्चा निघणार आहे त्यामुळे सरकार व पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मेट्रो सिनेमा येथून सकाळी हा मोर्चास प्रारंभ होणार आहे. मुंबईकरानी मोर्चेत मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी राज यांनी सोशल मिडीयातून आवाहनही केले आहे. सोन्यासारखी सत्ता जनतेने यांच्या हातात दिली पण आधीच्या सरकारपेक्षा अधिक चांगल घडेल असा आशवाद निर्माण झाला होता पण यांनी तो लवकरच उध्दवस्त केला अशा शब्दात राज यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. हा मोर्चा केवळ रेल्वे प्रशासनाविरोधात नाही तर इतर विषयाबाबतही आहे असे राज यांनी म्हटले आहे. त्यामुळै राज यांची तोफ कुणावर धडाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.