डोंबिवली धावणार थालासिमिया ग्रस्तांच्या मदतीसाठी :

 ४ मार्चला रन फॉर थालासिमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन

थालासिमिया जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट आणि कल्याण डोंबिवली रनर्सचा उपक्रम*

डोंबिवली : रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली आमच्यासारख्या हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्यूण्यामुळे आनुवंशिकतेतून पुढे जाणा-या थालासिमिया या रक्तविकाराला आटोक्यात आणण्याचा चंग रोटरी परिवाराने बांधला आहे. त्याच उद्दीष्टाने *रविवारी, ४ मार्च२०१८* रोजी डोंबिवलीत रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट आणि कल्याण डोंबिवली रनर्स या संस्थाच्या माध्यमाने *रन फॉर थालासेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन* स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

थालासेमिया प्रिव्हेंशन मोहीम यंदाचा थ्रस्ट एरिया असल्याचं रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी.शिवराज यांनी ठिकठिकाणच्या उपक्रमांमध्ये स्पष्ट केले आहे. थालासिमिया या विकाराबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर जागरूकता निर्माण करणे आणि बाधित रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दिलासा देणे हे आमचे उद्दीष्ट असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी दिली. काही वर्षांच्या कालावधीत थालासिमिया या विकाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

* रविवार ४ मार्च २०१८,रोजी सकाळी ६.३० वाजता, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकूल येथून संपन्न होणार आहे. ५ कि.मी. व १० कि.मी. अशा दोन स्तरावर ही मॅरेथॉन असणार आहे*

मॅरेथॉन प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज देखिल भरता येणार असून कल्याण-डोंबिवलीतील इच्छूकांनी *www.runburn.in/dpr-2018.html* या संकेत स्थळावर, तसेच

१) *जगदीश सिक्यूरिटीज*, घनश्याम कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक२ए/३ डी वींग, सुभाष रोड, डोंबिवली पश्चिम,
२)गाळा क्रमांक ४, *डेन एनबीसी*, विश्वनाथ दर्शन, आयरे रोड, एस.के.पाटील रोड, डोंबिवली पूर्व येथे संपर्क साधावा.
हा उपक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने 15 फेब्रुवारी पर्यन्त इच्छुकांना अर्ज भरण्याची संधी असेल, संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन *प्रकल्प प्रमुख दिलीप भगत* तसेच देवेंद्र माने, विश्वनाथ ऐय्यर, धनंजय शेट्टीगर,योगेश विरकर आदींनी केले आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*दिलीप भगत : 09820775354*
*देवेंद्र माने 9820815930*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!