डोंबिवलीत ११ फेब्रुवारीला सहा गुणीजनांचा नागरी सत्कार सोहळा :
डोंबिवली : शहराच्या गेल्या सव्वाशे वर्षांच्या वाटचालीतल्या मोठ्या टप्प्याची साक्षीदार असलेली आणि आपल्या अंगभूत गुणांच्या आधारे शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावलेली अशी मोजकीच मंडळी आता वयोमान उलटूनही सार्वजनिक क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यातली काही त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहेत, तर काहींनी प्रसिद्धीची अपेक्षाही न ठेवता शहरासाठी आपलं अनमोल योगदान दिलं आहे. ज्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहणं पसंत केलं नाही, अशा निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ४१ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘नागरी सत्कार समितीने २०१४ साली सुरु केली . यंदा त्या उपक्रमाचं पाचवं वर्ष.
गुणीजनांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नव्हे, परंतु त्यांच्या कार्याचा आदर्श पुढल्या पिढ्यांपुढेही रहावा, आणि त्यातून स्फूर्ती घेत सामाजिक बांधिलकी मानणारी, गावकीचे भान राखणारी तरुण कार्यकर्त्यांची नवी पिढी उभी रहावी या उद्देशाने नागरी सत्कार समिती प्रतिवर्षी अशा सहा डोम्बिवलीकर स्त्री-पुरुषांचा सन्मान करते.
यंदाच्या पाचव्या वर्षी (२०१८) सामाजिक क्षेत्रातील विशेषतः अंधत्व निवारण क्षेत्रातील कार्यकर्त्या *सरोज नेरुरकर*, सामाजिक क्षेत्रातील विशेषतः आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील कार्यकर्त्या *हेमा धारगळकर*, कामगार क्षेत्रातील *श्रीनिवास जोशी*, ज्येष्ठ नागरिक संघटन क्षेत्रातील *रमेश पारखे*, शिक्षण आणि राष्ट्रीय सामाजिक सेवा क्षेत्रातील *डॉ. कृष्णन नम्बुद्री* तसेच रोटरी, वैद्यकीय मदत क्षेत्रातील *एन. आर. हेगडे* यांचा सन्मान समिती करत आहे. यंदा हा सोहळा दिमाखात टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणावर रविवार, दि . ११ फेब्रुवारी सायंकाळी ५-३० ला जेष्ठ संपादक *श्री. विजय कुवळेकर* यांच्या प्रमुख उपस्थितित आणि जेष्ठ पत्रकार *सुधीर जोगळेकर* यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .
*सत्कार समिती विश्वस्त*
मधुकर चक्रदेव, माधव जोशी, विनोद करंदीकर, सुधीर जोगळेकर, प्रवीण दुधे , डॉ. उल्हास कोल्हटकर , पर्णाद मोकाशी , संदीप वैद्य , श्रीपाद कुलकर्णी , सचिन बोडस , सौ. दर्शना सामंत ,नीलिमा भागवत , गुलाब वझे
*सहभागी ४१ संस्था*
१.लायन्स क्लब ऑफ डोंबिवली, २. भारत विकास परिषद, डोंबिवली, ३. राष्टीय शिक्षण संस्था, डोंबिवली पश्चिम ४. ओंकार एज्युकेशनल ट्रस्ट ५. गुरुकुल द डे स्कूल ६. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली ७. रिअल अँकॅडेमी, ८. रिअल्युमनाय ९. डीएनएस बँक १०. अभिनव बँक ११. कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी १२. श्री गणेश मंदिर संस्थान १३. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १४. श्रीलक्ष्मीनारायण संस्था १५. डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवार १६. ब्राह्मण सभा १७. आगरी यूथ फोरम १८. वनवासी कल्याण आश्रम १९. चतुरंग प्रतिष्ठान २०. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती २१. अभ्युदय प्रतिष्ठान २२. मनःशक्ती केंद्र २३. नॅशनल यूथ ऑर्गनायझेशन २४. ब्राह्मण महासंघ २५. उर्जा फौन्डेशन २६. डोंबिवली पॅसेन्जर्स असोसिएशन २७. डोंबिवली जिमखाना २८. श्री कला संस्कार २९. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश मंदिर ३०. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ३१. सुदर्शन साउंड सर्व्हिस ३२. वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट ३३. विवेकानंद केंद्र ३४. ज्ञानप्रबोधिनी ३५. राष्ट्रपुरुष स्मृती जागरण समिती ३६. विवेकानंद सेवा मंडळ ३७. वेध अकॅडेमी ३८. यशराज कलामंच ३९ रोटरी क्लब डोंबिवली वेस्ट ४० सुसेवा ,डोंबिवली ४१ कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग ,डोंबिवली.