बिनशेती  शिबिरातील शेतकऱ्यांचे अर्ज  महिना होवूनही पडून :  जिल्हाधिकाऱ्यांच्या  आदेशाकडे महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

भिवंडी : मोठा गाजावाजा करून ठाणे जिल्हाधिकारी यांनी ठाणे  जिल्ह्यात गेेल्या महिन्यात महाराष्ट्र जमीन महसूल सहित 1966 कलम 42 ब सुधारणेच्या अनुषंगाने जाहीर शिबिराचे आयोजन केेेले होते. मात्र या महिन्यात दुुसरे  शिबीर आयोजित करण्यात आले असताना सुद्धा अद्याप शेतकऱ्यांचे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील महसूल अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकाऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे ,तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे आरोप शेतकरी करीत आहे .

या बाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण , भाग चार दिनांक 5 जानेवारी 2017 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल सहित 1966 कलम 42 ब नुसार सुधारणा केलेली आहे ,त्यानुसार अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट केलेल्या जमिनीसाठी जमीन वापरातील रुपांतरणाची तरतूद केली आहे. या सुधारणेच्या अनुषंगाने ज्या जमिनी निवासी ,वाणीज्यक अशा इतर अकृषीक स्वरूपाच्या वापर विभागात आहे , त्याबाबत संबधित नियोजित प्राधिकारी यांच्याकडून मान्य असलेल्या वापर विभागानुसार माहिती प्राप्त करून संबधित खातेदार यांनी शिबिरात अर्ज करून वापर प्रयोजनानुसार त्यांच्या मालकीच्या भोगवटा वर्ग- 1 जमिनीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल सहित 1966 कलम 42 ब अन्वये मानीव रूपांतरण होण्याच्या दृष्टीने रूपांतरित कर व अकृषिक आकारणीची रक्कम इ .निश्चित करून सादर रक्कम भरणा करू शकतील ,तसेच सदरचे रक्कम भरणा केल्यानंतर लगेच फेरफर नोंद करणेत येऊन 7/22 ला अकृषिक नोंद करण्यात येईल , असे आदेश देऊन जानेवारी महिन्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले असताना यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दाखल केले मात्र महसूल अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करून अर्ज तसेच दाबून ठेवले असून याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे , पुन्हा या महिन्यात सुद्धा जिल्हाधिकारी यांनी बिनशेती शिबिराचे आयोजन केले आहे ,त्यामुळे गेल्या महिन्यात अर्ज करणाऱ्या शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे .या महिन्यात देखील जिल्हाधिकारी यांनी पुन्हा या तरतुदी प्रमाणे कार्यवाही करण्याकामी ठाणे जिल्ह्यातील ठाणे , कल्याण ,भिवंडी, अंबरनाथ या तालुक्यातील  मंडळ निहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ठाणे ,नवी मुंबई ,मीरा-भाईंदर ,कल्याण डोंबिवली महानगर पालिका , भिवंडी-निजामपूर महापालिका ,कुळगाव-बदलापूर नगर परिषद ,अंबरनाथ नगर पंचायत ,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या कार्य क्षेत्रात खातेदार यांनी आपल्या जमिनी विविध प्रयोजनासाठी बिनशेतीमध्ये रूपांतरित करावयाच्या असतील त्यांनी सदर शिबिरामध्ये जमिनीचा झोन दाखला व इतर संबधित कागदपत्रांसह सहभागी होऊन आपल्या जमिनी बिनशेती रूपांतरित करून घेण्याची कार्यवाही करण्या कामी ठाणे जिल्हाधिकारी डॉ .महेंद्र कल्याणकर यांनी आवाहन केले आहे . मात्र जानेवारी महिन्यातील शिबिरातील शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात असताना त्यावर प्रथम कार्यवाही करावी नंतर दुसरे Sशिबिर घेण्याची मागणी करण्यात येत असून संबधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *