मुंबईच्या उप-महापौर मा. हेमांगीताई वरळीकर यांच्या शुभहस्ते सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ व बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : चंपावाडी बाल गोपाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 26 जानेवारी रोजी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलंय.
१९६९ साली चंपावाडी बाल गोपाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाची स्थापना झाली. सामाजिक उपक्रम राबविणे हाच या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. गेल्या 50 वर्षांच्या प्रवासात मंडळाने सर्वच सण मोठ्या उत्साहाने साजरा केले आहेत.
२६ जानेवारीला चित्रकला स्पर्धेचे आयोजन
दहिहंडी आणि नवरात्री उत्सव हे मंडळाचे महत्वाचे उत्सव. प्रभादेवीच्या जुन्या पारंपरिक पद्धतीने दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सवादरम्यान दहा दिवस विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंडळातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. दरवर्षी सुमारे 700 ते 800 भाविक दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने स्वतःचा एक नवीन लोगो तयार केला आहे. 14 जानेवारी मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर मुंबईचे उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या हस्ते मंडळाच्या बोध चिन्हाचे अनावरण करण्यात आलंय.
असा होतो दहीहंडीचा उत्सव साजरा