हनीप्रीतला सहा दिवसांची पोलिस कोठडी
पंचकुला : बाबा राम रहिमची मानस कन्या हनीप्रीतला सहा दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला होता. राम रहिमची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर हनीप्रीत फरार होती. मंगळवारी पोलिसांनी तिला अटक केली होती. बुधवारी तिला कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत पंचकुला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. हनीप्रीतला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. परंतु कोर्टाने तिला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान बाबा राम रहिम आणि हनीप्रीतमध्ये अवैध संबंध होते असा आरोप हनीप्रीतच्या पतीने केला होता. बाबा राम रहिमसोबत तिने सिनेमात कामही केलं होतं.