भिवंडीत खाडी किनाऱ्यावरील अवैध गोदामांवर महसूल विभागाची धडक कारवाई 

भिवंडी : भिवंडीतील कशेळी खाडी किनाऱ्या लगतच्या सरकारी कांदळवन जमिनीवर राजरोसपणे भराव टाकून अवैधपणे गोदामांचे बांधकाम करण्यात आले आहे.सदर गोदामांचे बांधकाम पर्यावरणाला हानिकारक ठरल्याने ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने प्रांत अधिकारी डॉ.संतोष थिटे, तहसीलदार शशिकांत गायकवाड ,मंडळ अधिकारी महेश चौधरी ,तलाठी शैलेष भोजने ,संतोष आगिवले यांच्या महसूल पथकाने शुक्रवारी धडक कारवाई करून फर्निचर ,भंगार साहित्याची १७ गोदामे भुईसपाट केली
.महसूल विभागाच्या या निष्कासन कारवाईने खारफुटीच्या सरकारी जमिनीवर अनधिकृत गोदामे उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायीकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.कशेळी खाडी किनाऱ्यालगतच्या सर्व्हे नं. १९३ या ११ हेक्टर खाजण जमिनीपैकी सुमारे २ एकर जमिनीवर दिपक पाटील ,राम भोसले ,हरीश तरे,वासू पाटील आदींनी बेकायदेशीरपणे टोलेजंग गोदामे उभारली होती.येथील चेअर्स अँड मोअर ,इन हाऊस ,नवकार ,ट्रीक ,ट्रेझर या गोदामांमध्ये नामांकित फर्निचर कंपनीचे साहित्य साठवण्यात येत होते.कांदळवन व तिवर वृक्षाच्या जमिनींवर भुमाफियांची वक्रदृष्टी वळल्याने पर्यावरणासोबतच खाडीतील प्रदूषण व जैवसाखळी खुंटण्याचा धोका निर्माण झाला होता.कांदळवन नष्ट होत असल्याने भविष्यात जलसंपदा दुर्मिळ होत असल्याची चिंता पर्यावरण प्रेमींना सतावू लागल्याने कशेळी येथील खार जमिनीवरील अवैध गोदाम बांधकामांच्या विरोधात नागरिकांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या.त्यानूसार महसूल विभागाने एक पोकलेन ,जेसीबी मशीन व २५ मजूरांच्या मदतीने अनधिकृत गोदामांवर धडक कारवाई करून १७ गोदामे निष्कासित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *