केडीएमसीच्या तिजेारीची चावी भाजपकडे : राहुल दामले स्थायी समितीचे नवे सभापती

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाच महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणा-या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झालीय. मात्र पून्हा एकदा स्थायी समितीचे सभापतीपद हे डोंबिवलीला मिळालंय. तसेच यावेळी महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या दीपाली पाटील यांची निवड झाली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा स्थायी समिती सभापतीपदाचा कालावधी संपल्याने मंगळवारी सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. यंदाचे सभापतीपद हे भाजपच्या वाटयाला होते. त्यामुळे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झालीय. राहुल दामले हे अभ्यासू व ज्येष्ठ नगरसेवक म्हणूनच ओळखले जातात. यापूर्वी दामले यांनी उपमहापौरपदही भुषवले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराची त्यांना खडानखडा माहिती आहे. स्थायी समितीचे सभापती बनण्याची गेल्या अनेक वर्षापासून त्यांची इच्छा होती अखेर आज त्यांची इच्छापूर्ती झालीय. महापालिकेकडे निधीची कमतरता असल्याने अनेक विकास कामे रखडली आहेत. खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून आज राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. त्यादृष्टीनेही आपल्याकडे या निधीच्या माध्यमातून विकासकामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे दामले यांनी सांगितले. अर्थसंकल्प बनवताना शहरातील नामवंत अर्थतज्ञांच मार्गदर्शन घेणार असल्याचे दामले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने या सत्तेचा वापर दामले कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी कसा करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *