कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतून सात नक्षवाद्यांना अटक :  :  एटीएसने केली कारवाई : १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी  

 मुंबई : कल्याण, डोंबिवली आणि मुंबई परिसरातून सात नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलीय. यातील एक संशयीत अभियंता असून तो डोंबिवलीत वास्तव्यास होता. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी कारवाई पथकाने (एटीएस) या  सर्व संशयीताना अटक केलीय.  हे तेलंगणा राज्यातील असून सध्या ते मुंबईत वास्तव्यास होते.  युएपीए नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून  न्यायालयाने सर्वांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
नक्षलवादी केडर असलेला संशयीत कल्याण स्टेशनला येणार असल्याची खबर एटीएसला मिळाली होती. त्यांनी पाळत ठेवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची चौकशी केली असता इतर नक्षलवादीची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून त्याना घाटकोपर येथील रमाबाई अंबडेकर नगर आणि विक्रोळी परिसरातील कामराज नगर येथून सहा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. सर्व संशयीत व्यक्ती सीपीआय (माओवादी) या संघटनेचे काम करत असल्याचे उघड झाले आहे.  एटीएसने केलेल्या या कारवाईत राज्य गुप्तचर विभागाचाही सहभाग होता.  एटीएसने पंचासमक्ष घातलेल्या छाप्यात बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित अनेक कागदपत्रे या संशयितांच्या घरात सापडली आहेत. ३० ते ५२ वर्ष वयाचे सर्व आरोपी असून  नलगोंडा, करीमनगर (तेलंगणा) येथील ते मूळ रहिवाशी आहेत. यांच्यावर एटीएसने बेकायदा कारवाई प्रतिबंध (युएपीए ) कायदा १९६७ अन्वये त्यांच्यावर काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *