ओपन टॅक्स विरोधात कल्याणचे बिल्डर रस्त्यात उतरले 

कल्याण :  कल्याण डोंबिवली महापालिकेकडून इतर महापालिकेपेक्षाही अधिक ओपन लॅण्ड टॅक्स आकारण्यात येतो या विरोधात  कल्याण डोंबिवली परिसरातील बिल्डरांनी आज केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बिल्डरांच्या एमसीएचआय संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मात्र दोन दिवसांपूर्वीच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय कॅबिनेटच्या बैठकीत मांडला होता त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओपन लॅण्डचा विषय तातडीने मार्गी लावा असे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्रयानी आदेश दिल्यानंतरही कल्याणचे बिल्डर रस्त्यावर उतरले होते.

ठाणे व पुणे महानगरपालिकेत खुल्या जमिनीवर वार्षिक दर ६० रूपये प्रति चौ मीटर आकारण्यात येतो. इतर महापालिकेत कमीत कमी २० रूपये आणि जास्तीत जास्त ६० रूपये दर आहे.  मात्र केडीएमसीत कमीत कमी ३०० आणि जास्तीत जास्त २३०० आहे. त्यामुळे केडीएमसीतील जिझिया कर विरोधात बिल्डरांनी महापालिकेविरोधात दंड थोपटले आहे. दोन दिवसांपूर्वीच बिल्डर संघटनेच्या एमसीएचआयने शहरात लुटारू महापालिका म्हणून बॅनरही लावले होते. हा महापालिकेवर मोर्चा काढून वाढीव करविरोधात बिल्डरांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *