शौचालयाच्या दुरावस्थेविरोधात महिलांचा टमरेल मोर्चा
डोंबिवली : पूर्वेतील इंद्रानगर वसाहती मधील शौचालयाची दुरावस्था झाल्याने संतप्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर टमरेल मोर्चा काढून आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करीत महिलांना बाजूला केले. स्थानिक नगरसेविका दर्शना शेलार आणि आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे गा-हाणे मांडूनही समस्या सुटलेली नाही त्यामुळेच आंदोलन करावं लागल्याचे महिलांनी सांगितले.
इंदिरा नगर, त्रिमुर्ती आणि राजुनगर अशा तीन मोठ्या वसाहती आहेत. येथे एक हजारच्या आसपास रहिवाशी राहत आहेत. या वसत्यांनी केवळ 9 शौचालय असून त्याची दोन शौचालय बंद आहेत उर्वरित शौचालयांची खूपच दुरावस्था झालीय. अनेक शौचालयांचे दरवाजे तुटलेले अवस्थेत आहेत. त्यामुळे महिलांची खूपच अडचण होत आहे. शौचालयाची साफ सफाई केली जात नाही. केडीएमसीचे या शौचालयांकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी हातात टमरेल घेऊन रस्त्यावर उतरल्या. महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून शौचालयाची साफ सफाई व डागडुज्ी केली जात नाही. इतक्या मोठया लोकवस्तीला अवघे सात शौचालय आहेत त्यातील अनेक शौचालयांची दुरावस्था असल्याने प्रांतविधीसाठी येणा- या नागरिकांना लांबच लांब रांगेला सामोरे जावे लागते अनेक शौचालयांची दरवाजे तुटलेले असल्याने महिलांना अडचणीला सामोरे जावे लागते अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या नगरसेविका दर्शना शेलार यांच्या हा प्रभाग आहे. मागील अनेक वर्षांपासून हा परिसर शेलार परिवाराकडे आहे त्याचे वडील व माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी सांगितले की या परिसरात 33 लाख निधी मंजूर झाला आहे . मात्र GST चे रुपये ठेकेदारास वाढवून मिळत नाही त्यामुळे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे ती फाइल धूळ खात पडली आहे. तसेच 2015 – 16 चा निधी ही अजून मिळाला नसल्याचे शेलार यांनी सागीतले .तसेच ठेकेदार सदर शौचालय ही योग्य साफ करीत नसून येथील काही नागरिक स्वतः हुन शौचालयाची दरवाजा तोडतात असा आरोप त्यांनी केला.