अविनाश धर्माधिकारी यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार जाहीर
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला
डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा स्वामी विवेकानंद पुरस्कार माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांना जाहीर झालाय. स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला १० व ११ जानेवारी रोजी तर आणि पुरस्कार सोहळा १२ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वामी विवेकानंद विद्यामंदिर छत्रपती भवन दत्तनगर आयरे रोड डोंबिवली पूर्व येथे होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्काराचे २१ वे वर्ष आहे. बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर यांचे विजिगिषु समाजाच्या दिशेने वाटचाल या विषयावर व्याख्यान होणार आहे तर ११ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता स्त्री रोगतज्ञ डॉ उल्का नातू योग आचार्य या उत्तिष्ठत जाग्रत वरान्निबोधत या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीला पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जातो.आतापर्यंत विद्यावाचास्पती शंकर अभ्यंकर कै राम शेवाळकर डॉ जयंत नारळीकर डॉ रघुनाथ माशेलकर शं ना नवरे जलसंधारण तज्ञ माधवराव चितळे सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभूणे प्रसिध्द अभिनेते विनय आपटे शिक्षणतज्ञ डॉ रेणू दांडेकर योगाचार्य श्रीकृष्ण वासुदवे व्यवहारे दिलीप कुलकर्णी चंद्रशेखर टिळक इत्यादींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलय.