अग्निसुरक्षेची दक्षता घेणा-या उपहारगृहांना संघटनेचे सदस्यत्व
आयुक्तांच्या सुचनेचा हॉटेल संघटनेकडून स्वीकार
मुंबई : अग्निसुरक्षा, आरोग्य व इमारतीबाबत असणारे नियम पाळणा-या उपहारगृहांना हॉटेल संघटनेनी सदस्यत्व द्यावे अशी सुचना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी हॉटेल संघटनांंच्या पदाधिका-यांच्या बैठकीत केली. आयुक्तांच्या सुचनेचा पदाधिका- यांनी स्वीकार केलाय.
महापालिका क्षेत्रातील उपहारगृहांमध्ये अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांचे, तसेच आरोग्य व इमारत विषयक नियमांचे परिपूर्ण पालन करून उपहारगृहे ही सुरक्षित व चांगल्या दर्जाची व्हावीत, या उद्देशाने महापालिकेकडून सर्वच स्तराव प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी संध्याकाळी ‘आहार’, ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संघटनांची विशेष बैठक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत पार पडली. यावेळी आयुक्तांनी ही सुचना मांडली होती. आयुक्तांच्या सुचनेचा पदाधिका- यांनी स्वागत केलं. या विशेष बैठकीला सदर तिन्ही संघटनांचे पदाधिकारी, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती पद्मजा केसकर आदी उपस्थित होते.