‘ त्या ’ राजकीय नेत्याचे नाव जाहीर करा : काँग्रेसचे आव्हान, पालिका आयुक्त स्वीकारणार का ?
मुंबई : कमला मिल प्रकरणामध्ये एका राजकीय नेत्याने फोन करून दबाव आणल्याचे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याच वक्तव्याचा आधार घेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी त्या राजकीय नेत्याचे नाव आयुक्तांनी उघडपणे जाहीर करावे असे आवाहन एका पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे राजकीय नेत्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान पालिका आयुक्त स्वीकारणार का ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
निरूपम म्हणाले की, दबाव आणणारा राजकीय नेता कोण आहे हे सर्व जनतेला कळाले पाहिजे. पण आयुक्तांचे वक्तव्य हे जनतेची दिशाभूल करण्यासाठीच केलेले आहे. महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार फक्त खालच्या स्तरावर नसून उच्च स्तरावर म्हणजेच आयुक्तांच्या कार्यालयातसुद्धा असल्याचा आरोप निरूपम यांनी केला. कमला मिल प्रकरणाला संपूर्णतः महानगरपालिका आणि अजोय मेहताच जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आयुक्तांकउे देऊन नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजोय मेहता यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी असल्याचे निरूपम यांनी सांगितल. यावेळी पत्रकार परिषदेत मनपा विरोधीपक्ष नेता रविराजा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील, सुशीबेन शाह व प्रणील नायर उपस्थित होते.
मोजोजचे मालक नागरपूरचे
पहिल्यांदा आग मोजोज पबला लागली, त्यानंतर ती बाजूच्या पबला लागली. या दुर्घटनेत १४ जणांचा र्दुदैवी बळी गेलाय. मोजोजचे ६ पैकी ५ मालक हे नागपूरचे असून, हे नागपूर आणि भाजपा कनेक्शन आहे. त्यामुळेच त्यांना पकडण्यासाठी टाळाटाळ होत आहे असा आरोप निरूपम यांनी केला. युग पाठक या एकालाच अटक करण्यात आली. त्यासाठीही ९ दिवस लावले. मोजोजच्या एका मालकाचे वडील हे हवालाचे मोठे दलाल आहेत. त्यांचे दिल्लीत भाजपा नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत म्हणून हा तपास लांबवला जात आहे संशय निरूपम यांनी व्यक्त केला.