जपानमधील आर्थिक मंदी कमी करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट
शरद पवारांची मोदींवर टीका
मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनविरोधात शिवसेना व मनसेने दंड थोपटले असतानाच, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विरोध दर्शविला. जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठीच भारतात बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असल्याची टीका पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली. मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यावेळी पवार बोलत होते.

सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोकलसेवेमधील यातना कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही मात्र बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जात असल्याची नाराजी पवार यांनी व्यक्त केली. शेतक-यांच्या कर्जमाफी विषयी बोलताना पवार राज्य सरकारच्या कर्जमाफीचा निर्णय फसवा असल्याची टीका केली. सरसकट कर्जमाफी जाहीर केली तर मग निकषाची गरज काय ? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. . राज्यातील ६७ कापड गिरण्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे १७, ६०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. देशामध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील औद्योगिक उत्पादन घटले आहे. त्यामुळे बेराजगारी वाढत असल्याची नाराजी पवार यांनी व्यक्त केली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनमत सरकारविरोधात तयार झाले आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रीत होऊ शकतात त्यामुळे कार्यकत्यांनी आतापासूनच कामाला लागा असे आदेश पवार यांनी कार्यकत्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *