१० जानेवारीला  “महाराष्ट्र बंद” नाही,  अफवांवर विश्वास ठेवू नका

 मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांचे आवाहन

मुंबई : मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चा तर्फे १० जानेवरी रोजी कुठलाही बंद नाही. मराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट मागील काही दिवसांपासून पासून सोशल मिडियावर फिरत आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी केलय. तसेच मराठा क्रांति मोर्चा आणि सकल मराठा क्रांति मोर्चा चे नाव घेऊन कोणत्याही पक्ष संघटनेने दिशाभूल करू नये. अन्यथा अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशाराही पोखरकर यांनी दिलाय.

मराठा क्रांति मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहें. कुठल्या पक्षाचे वा कोणत्या संघटनेचे नाही. सकल मराठा समाज मराठा क्रांति मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही. आणि कोणीही मराठा समाजाच्या नावावर मराठा क्रांति मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही. १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत एक मराठा भावाला आपला जीव गमवावा लागला तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये अनेक ठिकाणी खाजगी मालमत्तेचं नुकसान केलं गेलं आहे व काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक ऍट्रॉसिटी सह इतर हि कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत यांच्या निषेधार्त काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून, “महाराष्ट्र बंद” बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही. तसेच मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे नाव वापरून कोणी खोटे पोस्ट टाकत असेल तर मेसेज टाकणा-याला फोन करून जाब विचारावा असे त्यांनी सांगितलं.

मराठा दलित वादाच्या कटकारस्थानाला बळी पडू नका
मराठा समाजातील तरूणांचा वापर करीत राजकारण करून मराठा- दलित वाद लावू पाहणा-यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये. मराठा समाजाला या दंगलीत उतरवून मराठ्यांनाच टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करीत,  मराठ्यांची चळवळ मोडीत काढत, मराठ्यांचे  लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न हाणून पाडावा. मराठा समाजाला आपल्या मागण्यांकड़े लक्ष देणे गरजेच आहें दंगली पेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय याकड़े लक्ष देणे गरजेच आहे असेही पेाखरकर यांनी स्पष्ट केलयं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!