समाजभिमुख पत्रकारितेचा वारसा पत्रकारांनी पुढे न्यावा : रविंद्र चव्हाण
डोंबिवली : मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजाभिमुख पत्रकारितेची पायाभरणी केली. लोकमान्य टिळक आगरकर आणि अत्रेंनी हाच वारसा समर्थपणे सांभाळला. त्यामुळे पुढील काळात पत्रकारांनी हाच वारसा पुढे न्यावा अशी अपेक्षा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.
कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने बालभवन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. याप्रसंगी केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर, लोकमत वृत्तपत्राचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान, न्यूज 18 लोकमतचे आऊटपुट हेड राजेंद्र हुंजे आदी उपस्थित होते. महापौर म्हणाले की, पत्रकारांनी समाजात चालणाऱ्या अपप्रवृत्तींवर कायमच प्रहार केला पाहिजे. सत्ताधा-यांनाही त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिल्यास त्याचा लेाकहिता तर सत्ताधाऱ्यांच्या चूका पत्रकारांकडून वेळीच निदर्शनास आणून दिल्यास त्यातून लोकहित साधले जाते असेही ते म्हणाले. पत्रकारांनी समाजहित डोळयासमोर ठेवूनच पत्रकारिता केली पाहिजे असे मात्र राजकारण्यांप्रमाणे पत्रकारांनी शासकीय लाभ प्राप्त करून घेणे हे नैतिकदृष्टया योग्य नसल्याचे मत लोकमत वृत्तपत्राचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी मांडलं. तंत्रज्ञानातील आधुनिक बदलांमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असून पत्रकारांनी आपली लोकभिमुखता आणि विश्वासार्हता जपणे गरजेचे असल्याचा सूर अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.
केतन बेटावदकर झुंझार पत्रकार पुरस्कारने सन्मानित
सोशल मिडीया क्षेत्रात ठसा उमटविणारे एलएनएन चे संपादक केतन बेटावदकर यांना झुंझार पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलय. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते बेटावदकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकार प्रशांत माने यांना ‘स्व.श्रीकांत टोळ पुरस्कार तर विशाल वैद्य यांना ‘स्व.रत्नाकर चासकर, छायाचित्रकार स्वप्निल शेजवळ यांना उत्कृष्ट छायाचित्रकार तर इंडियन मेडीकल संघटनेचे डॉ. मंगेश पाटे यांचा ‘पत्रकार मित्र’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.