न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
पनवेल : न्यू कळंबोली एज्युकेशन सोसायटीचे, न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली शाळेत देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची वेशभुषा परिधान केली होती. स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर माहितीही देण्यात आली. शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पनवेल महापालिकेतील नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सोलंकी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे आदी उपस्थित होते.