डोंबिवली रेलरोको आणि तोडफोड प्रकरणी एक ते दीड हजार आंदोलकांविरोधात गुन्हे 

डोंबिवली – भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ  बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत रेलरोको आणि रेल्वे तिकीट खिड़किच्या काचा फोडून नुकसान केल्याच्या विरोधात सुमारे 1000 ते 1500 अनोळखी आंदोलक स्री व पुरुष यांच्या विरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वे एक्ट 174, 143, 149 सह सार्वजनिक मलमत्तेचा नुकसान करणे अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय. सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडीओ आदी मार्फत आंदोलन कर्त्यांचा  शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी  सांगितले. दरम्यान शहरात रेलरोको आणि रास्ता रोको आंदोलनानंतर गुरुवारी डोंबिवलीतील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *