भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ पडघे गावात बंद
पडघे : भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेल येथील पडघे गाव आणि कळंबोलीत बंद पाळण्यात आला. पडघे गावातील आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करीत घोषणाबाजी केली. पडघे व कळंबोली परिसरातील दुकाने व रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. शांततेच्या मार्गाने बंद पार पडला. यावेळी पडघे गावातील युवा नेता राहुल कांबळे, रुपेश कांबळे, तुषार पाटील, विजय कांबळे, दीनानाथ कांबळे, भाऊ कांबळे, आनंद शेट्टी, महेंद्र गायकवाड, दीपक कांबळे, दिलीप कांबळे, धर्मदास कांबळे, रोशन कांबळे, अमित कांबळे, रोहन कांबळे, माँटी कांबळे, सचिन कांबळे, राकेश कांबळे, जीवन जाधव, जयेश जाधव , दिनेश जाधव, राकेश जाधव, सुदर्शन जाधव, अमोल सोनवणे, प्रेम सोनवणे जॉन डोंगा आणि महिला मंडळ आदी आंबेडकरी जनता सहभागी झाली होती.