डोंबिवलीत डॉक्टरांचे वातानुकूलीन दालनात बसून राजेशाही उपोषण
(आकाश गायकवाड)
डोंबिवली : डॉक्टर्स आणि हॉस्पिटलवर होणारे हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे डोंबिवली, कल्याण अंबरनाथ बदलापूर भिवंडी मधील शेकडो डॉक्टरांनी २ ऑकटोबर या जागतिक अहिंसा दिनाचा मुहूर्त साधुन डोंबिवली जिमखान्यात लाक्षणिक उपोषण केले. मात्र वातानुकूलीन दालनात बसून राजेशाही थाटात डॉक्टरांनी उपोषण केल्याने शहरात हा चर्चिला बनला आहे.
डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांकडे सरकराने लक्ष वेधण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी वानखेडेकर यांनी डॉक्टरांना काम करताना असलेली भीती आणि सरकारचे यावर दुर्लक्ष यावर आपले मत व्यक्त केले. आज आमच्या हॉस्पिटल मध्ये एखादया सिरीयस रुग्णांवर उपचार करण्याअगोदर मनात असा विचार येतो कि, जर या रुग्णाचे काही बरे वाईट झाले तर आपल्या जीवाचे काय होईल ? त्यामुळे डॉक्टरांचे संरक्षण मिळाले पाहिजे हीच आंदोलन मागील भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले .यावेळी इंडियन मेडिकल असोसिरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी वानखेडेकर यांनी थेट सरकारला यासाठी जबाबदार ठरवले. सरकारने यासाठी आपलेधोरण बदलले पाहिजे असेही सांगताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यात लक्ष दिले पाहिजे अशी मागणी केली. तसेच सरकारने आपले धोरण बदलले पाहिजे असे सांगताना गेली ६५ वर्ष सरकार आरोग्य व्यवस्थेवर आवश्यक खर्च करीत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे आज उपोषण करण्याची वेळ आली आहे. असे जर होत असेल तर आपला देश कसा पुढे जाईल. जनतेला खूप त्रास होत आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली