31 डिसेंबरच्या पूर्व संध्येला मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ

घाटकोपर :  कमला मिल आगीच्या भीषण दुर्घटने नंतर 31 डिसेंबरच्या पूर्व संध्येला मुंबई पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून मॉल , हॉस्पिटल , पंचतारांकित हॉटेलं , मार्केट मध्ये सुरक्षा वाढवलीय . उपनगरातील कुर्ला येथील फिनिक्स मॉल मध्ये नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांनी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवलाय . सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्यास पोलिसांनी बंदी केली होती . मॉल मध्ये वाढणाऱ्या गर्दीमध्ये नागरिकांना सतर्क राहून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!