14 निष्पापांच्या बळीनंतर मुंबई महापालिकेची हॉटेल्स आणि पबच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई 

मुंबई : कमला मिल्स कंपाऊंड आगीत १४ निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय. हॉटेल आणि पबच्या अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा करणा-या बीएमसीने शनिवारी धडक कारवाई करीत ही अनधिकृत बांधकामे तोडून टाकली. मात्र पालिकेने ही कारवाई अगोदरच केली असती तर कदाचित हे जीव वाचू शकलो असतो अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी व्यक्त केलीय.

कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. यानंतर येथील अनधिकृत बांधकाम आणि अग्निसुरक्षेचा प्रश्न चव्हाटयावर आला होता. महापालिकेवर सर्वच स्थरातून टीकेची झोड उठली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने तातडीने  शुक्रवारीच महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली. त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच रघुवंशी मिल आणि कमला मिल परिसरातील अनधिकृतपणे बांधकाम केलल्या  हॉटेल आणि पबवर धडक कारवाई करण्यात आली. गच्चीवरील हॉटेलवर तसेच हॉटेलचे शेडही तोडण्यात आले.  घाटकोपर चिरागनगर येथील  संतोष बार,  पेनानसुला हॉटेल अंधेरी, गेाल्डन गेट फिल्म सिटी मालवणी मालाड, न्यू शालीमार ग्रॅण्ट रोड, पारसी जिमखाना, व्ही एस बार.    वुडलॅण्ड हॉटेल जुहू,  कुबे अॅण्ड क्रीस्टल अशा सहा ते सात हॉटेलवर कारवाई करण्यात आलीय. संध्याकाळपर्यत यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या  कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं पथक यासाठी तयार करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!