कमला मिल्स अग्नितांडव : महापालिकेच्या अधिका- यांवर फौजदारी गुन्हा दाखल करू : मुख्यमंत्री
मुंबई : कमला मिल्स अग्नितांडव झालेल्या परिसराला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. अतिश्य दुर्दैवी अशी घटना असून महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. निष्काळजी केल्याप्रकरणी पाच अधिका-यांना निलंबीत करण्यात आलय. हॉटेल मालकावर कारवाई होणारच आहे मात्र ज्या अधिका- यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करू असेही मुख्यमंत्रयांनी सांगितलं. मुंबईतील अशा बांधकामांचे ऑडीट करण्याचे आदेश मुख्यमंत्रयांनी दिले.
कमला मिल्स अग्नितांडवात १४ जणांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेतील पाच अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. जी दक्षिण‘ विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिश बडगिरे आणि सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी (ADFO) एस. एस. शिंदे या ५ अधिका–यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिलीय.
मनसेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
कमला मिल्स कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून आगीसंदर्भातही नियम पायदळी तुडवले जात आहेत अशी तक्रार मनसेचे नेते मंगेश कशाळकर यांनी महापालिकेकडे केली होती. मात्र कमला मिल्स कंपाऊंडमध्ये कोणत्याही प्रकारची अवैध गौष्टी होत नसल्याचे उत्तर बीएमसीकडून त्यांना देण्यात आले होते. मुंबई महापालिकेने या तक्रारीकडे वेळीत लक्ष दिले असते तर १४ जणांचे प्राण वाचू शकले असते.
http://www.citizenjournalist4.com/kamala-mill-fire-news-3563/
http://www.citizenjournalist4.com/kamla-milla-_rahul-gandhi-tweet-3569/
http://www.citizenjournalist4.com/fire-in-jalna-mills-3555/