देव तारी त्याला कोण मारी, लोकलखाली उडी घेऊनही तो बचावला : नाहूर स्थानकातील थरार प्रकार 
घाटकोपर ( निलेश मोरे ) :  देव तारी त्याला कोण मारी ‘ या म्हणीचा  प्रत्यय बुधवारी उपनगरातील नाहूर स्थानकात रेल्वे प्रवाशांनी अनुभवला. एका प्रवाशाने लोकलखाली उडी घेतली पण लोकल गेल्यानंतरही तो सुखरूपपणे बचावला होता. आरपीएफ पाेलिसांनी त्याला बाहेर काढले.  उपेंद्र प्रसाद ( 62 ) असे या व्यक्तीचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. तेा काहीच बोलत नसून.त्याने  लेाकलखाली उडी का घेतली याची माहिती मिळू शकलेली नाही. सध्या तो रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.
दुपारी एकच्या सुमारास फलाट क्र १ वर आलेल्या कल्याण लोकलखाली एका व्यकतीने स्वत:ला झोकून दिले. प्रवाशांकडून  किंचाळण्याच्या आवाज झाल्याने सगळयांचीच धावपळ उडाली. कोणी तरी व्यक्तीने रेल्वे खाली उडी घेतली असे काही प्रवासी सांगत होते. प्रवाशांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून गस्तीवर असलेले आरपीएफ पोलीस जसवंत सिंह आणि काशिनाथ डरंगे यांनी फलाट क्र १ कडे  धाव घेतली. त्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे झाले असतील त्याचा जीव गेला असेल असेच सगळयांना वाटत होते. लोकलने फलाट सोडला पण ती व्यक्ती सुखरूप पाहून सगळयांनाच धक्का बसला. प्रवाशांना सुटकेचा नि:श्वास सोडला. सगळयांनी देवाचे आभार मानले.  पोलिसांनी त्या व्यक्तीला उचलून फलाटावर ठेवले. तो काहीच बोलत नव्हता. त्याच्याकडील असलेल्या आधारकार्डवरून त्याचे नाव उपेंद्र प्रसाद व तो बिहारचा रहिवासी असल्याची ओळख पटली. मात्र या व्यक्तीने  रेल्वेखाली जीव का दिला याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.  घरच्या वादातून या व्यक्तीचे मानसिक संतुलन  ढासळल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.  या व्यक्तीकडे काही ओळखीच्या व्यक्तीचे मोबाईल नंबर होते या नंबरवर पोलिसांनी फोन लावले मात्र फोन उचलल्या नंतर कुणीही रिप्लाय देत नसल्याने उपेंद्र प्रसाद याच्या घरच्या व्यक्तीचा तपास लागू शकलेला नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!