कायद्यांचे पालन करा, नगरसेवक पराग शाहांची फेरीवाल्याना तंबी
घाटकोपर ( निलेश मोरे ) : एल्फिस्टन – परेल दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवरील होत असलेल्या राजकीय वादावर तोडगा काढून न्यायालयाने स्टेशन परिसरापासून 150 मीटर तर शाळा महाविद्यालयापासून 100 मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बसण्यास बंदी आणून त्या त्या परिसराच्या अंतरात ना फेरीवाला क्षेत्राचे फलक लावले. मात्र पालिकेने फलक लावूनही फेरीवाले आपले बस्तान हटवत नसल्याने नागरिकांना व वाहतुकीला समस्येला सामोरे जावे लागत आहे . नागरिकांनी याबाबत स्थानिक नगरसेवक पराग शहा यांच्याकडे तक्रार मांडल्यानंतर घाटकोपर प्रभाग क्र 135 चे भाजपा नगरसेवक पराग शहा यांनी थेट नागरिकांना सोबत घेत स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना कायद्याचं पालन करण्याची तंबी दिली . 150 मीटर व 100 मीटर परिसरातील फेरीवाले हटले नाही तर पालिका रोज कारवाई करत राहील आणि जप्त केलेला माल पुन्हा परत मिळणार नाही. त्यामुळे तुमचं नुकसान होईल याकडे नगरसेवक पराग शहा यांनी फेरीवाल्यांचे लक्ष वेधत कायद्याचे पालन करण्याची समज दिली.