बीयर महागली, मद्यप्रेमींना जबरदस्त ‘किक’
मुंबई (विनोद साळवी) : स्ट्राँग, माईल्ड बिअर पिऊन चिल आऊट होणाऱ्या मद्यप्रेमींना आता चांगलीच ‘किक’ बसणार आहे. राज्य उत्पान शुल्क विभागाने शुक्रवारी अचानक बीयरच्या किमतीत वाढ करण्याची अधिसूचना जारी केल्याने मुंबईत माईल्ड 165 तर स्ट्राँग बीयरसाठी 175 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात आतापर्यंत पाचवेळा बीयरच्या किमतीत वाढ झाली असून देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत ती सर्वाधिक आहे.
बीयर निर्मिती करणार्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारे एक दोन नव्हे तर तब्बल पाचवेळा बीयरच्या किमती वाढ झाली आहे. उपहारगृह चालकांच्या मते 28 डिसेंबरपर्यंत मुंबईत बीयरचा पुरवठा सुरळीत होणार आहे. दुसरीकडे 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आतुरलेल्या तळीरामांना मात्र बीयरची चव चाखणे चांगलेच महागात पडणार आहे. 650 मि.लिच्या एका बीयरसाठी यापूर्वी 140 रुपये मोजावे लागत होते. त्यात आता 15 रुपयांनी वाढ होवून एका बीयरसाठी 165 रुपये मोजावे लागणार आहेत. तर स्ट्राँग बीयरसाठी यापूर्वी 145 रुपये मोजावे लागत होते. तीच बीयर आता 175 रुपयांना मिळणार आहे. बीयर उत्पादकांनी राज्य सरकारकडे स्ट्राँग बीयरसाठी 35 तर माइल्ड बीयरसाठी 25 टक्के दरवाढीची मागणी केली होती. मात्र सरकारने ही वाढ अवघी 17 टक्के मान्य केल्याचा खुलासा केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त आश्विनी जोशी यांनी याबद्दल दुजोरा दिला आहे.
छान बातमी आहे