शिक्षक संतोष औटी राज्यस्तरीय लोककल्याण मानवसेवा पुरस्काराने सन्मानित
डोंबिवली : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाळेचे शिक्षक संतोष औटी याना राज्यस्तरीय लोककल्याण मानवसेवा या पुरस्कारा ‘ने सन्मानित करण्यात आलय. मुंबई येथील दामोदर नाट्यगृह हॉल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय लोककल्याण सांस्कृतिक एकात्मता परिषद २०१७ या कार्यक्रमात सिनेकलाकार अक्षय कुलकर्णी यांच्या हस्ते औटी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सिनेकलाकार पौर्णिमा शिंदे आणि संजीवनी जाधव उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघ भारत व समृध्दी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारत थायलंड येथील आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदे अंतर्गत जागतिक मानव हक्क दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संस्थाचा गौरव करण्यात येतो. त्यासाठी मुंबईतील दामोदर नाट्यगृह हॉल मध्ये आंतरराष्ट्रीय लोककल्याण सांस्कृतिक एकात्मता परिषद-२०१७ चे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात औटी याना भव्य सन्मानचिन्ह अभिलेख प्रमाणपत्र, कार्याची माहिती संकलित केलेला अंक देऊन सन्मानित करण्यात आलं. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याने औटी यांचे अभिनंदन होत आहे.
—