गरीब, आजारी व्यक्तींना मोफत नाश्ता : डोबिवलीतील पाचजणांची अशीही समाजसेवा
डोंबिवली : अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान समजले जाते. हाच उदात्त हेतू डोंबिवलीतील पाचजणानी यशस्वी केलाय. दररोज सकाळी गरीब आणि आजारी व्यक्तींना मोफत नाश्ता देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. व्यंकटेश पै, आनंद डिचोलकर, सुरेश भंडारी , सुरेंद्र शेट्टी आणि गोपाळ हेगडे अशी त्या पाच समाजसेवकांची नावे असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्रच कौतुक होत आहे.
डोंबिवली पूर्वेकडील गोपाळनगर गल्ली क्र. २ येथील अम्मा – आण्णा कॅन्टीनमध्ये गरीब व आजारी व्यक्तींना मोफत नाश्ता दिला जातो.गेल्या आठवडाभरापासून हा उपक्रम सुरू केला असूूून, आता गरिबांची आणि रुग्णाची गर्दी होऊ लागलीय. मात्र आर्थिक भार जास्त पडत असल्याने सर्वाना मोफत देणे शक्य नसल्याने सकाळी १० नंतर येणाऱ्याना नाश्त्याच्या अर्धा बील दिला जातोय. तसेच व्यंकटेश पै हे दोन वर्षांपूर्वी दर रविवारी गरिबांना मोफत खिचडी देत होते. ३० ते ३५ जणांना सदस्य बनवून असा उपक्रम डोंबिवली पश्चिमेलाही सुरु करण्याचा मानस आनंद डिचोलकर यांनी व्यक्त केला.