५० हजार मुंबईकरांनी केला ‘स्वच्छता अॅप ’ चा वापर : आतापर्यंत २७ हजार तक्रारींचे निवारण
मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छता अॅप तयार करण्यात आला असून आतापर्यंत ५० हजार मुंबईकरांनी स्वच्छता अॅप डाऊन लोड केला असून या अॅपद्वारे आतापर्यंत सुमारे २७ हजार तक्रारींचे निवारण करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिलीय.
स्वच्छता मोहिमेला महापालिकेबरोबरच मुंबईकरांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ‘स्वच्छता अॅप’ नागरिकांनी डाऊनलोड करण्यासाठी पालिकेकडून जनजागृती मोहिम राबवली जात आहे. सुप्रसिद्ध कलाकार श्रुती मराठे व गौरव घाटणेकर हे सुध्दा दुरचित्रवाणीवरून आवाहन करीत आहेत. तसेच रेल्वे-स्टेशन, बस स्टॅन्ड, मॉल्स, महाविदयालय, शाळा तसेच शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता रथ व पथनाटयाद्वारे जनजागृती सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे श्री आस्था महिला बचत गटाद्वारे स्वच्छतेबाबत प्रबोधन करीत आहेत. तसेच वस्ती पातळीवरील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान मध्ये स्थानिक संस्थाकडून जनजागृती केली जात आहे.स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याच्या पालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मुंबईकरांनी GOOGLE PLAY STORE / APPLE APP STORE वरुन “Swachhata-MoHUA App” डाऊनलोड करून, त्या अॅपच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अस्वच्छता आढळेल तेथील फोटो काढून ‘स्वच्छता ऍप’द्वारे पालिकेकडे पाठविण्यात यावे असे आवाहन पालिकेने केलय.
Fulpakhru garden ke samne kachra pada hai
yeh app ushike liye hai. isko download karke kachreka ka photo bmc ko bhej sakte hai. bmc 12 ghante me kachreka problem solve karegi.