ज्येष्ठ समाजसेवक आणि दलित पँथरचे कार्यकर्ते  एकनाथ भालेराव यांचं निधन 

लोणावळा – मावळ तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्ते , दलित पँथरचे कार्यकर्ते आणि  १२ गावची १३ पोर  या  गृपच्या माध्यमातून  अनेक तरुणांना एकत्र करून चळवळीत जोश  आणणारे   ज्येष्ठ  समाजसेवक एकनाथ संभाजी भालेराव यांचं अल्पशा आजाराने वयाच्या 56 व्या वर्षी मंगळवारी शिल्पकार नगर ,कुरवंडे  येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे.  त्यांच्या पश्चात  पत्नी , मुले ,मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे ,

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन तरुणपणा पासून चळवळीचा वसा हाती घेऊन नेहमीच अनेक कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग होता. काबाडकष्ट कष्ट करून त्यांनी आपले मानाचे स्थान ठेवून ins शिवाजी मध्ये नोकरीस कार्यरत होऊन आपल्या कुटुंबीयांचा संभाळ करून एक आदर्श पालकाची जबाबदारी पूर्ण केली , कोणीही  लहान असो की मोठा त्यांच्याशी सवांद करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे एकमेव कलाकार सुद्धा होते. त्यांच्याशी एकदा ओळख झाली की त्यांचे कायमचे मित्र झालेच पाहिजे असा त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. त्याचेअक्षर सुंदर होते. त्याना  गाण्याची आवड होती,  मोर्चा , आंदोलनात नेहमी पुढे असायचे. त्यांच्या निधनामुळे परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे .

2 thoughts on “ज्येष्ठ समाजसेवक आणि दलित पँथरचे कार्यकर्ते  एकनाथ भालेराव यांचं निधन ”
  1. Asha manmilau manuskicha amcha dadanna manapurvak shradhanjali. Asha swabhavachi vyakti hone ashakya ahe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!