कानपूर आयआयटीतून बदलापूरचा अक्षय कांबळे २० दिवस बेपत्ता

प्रशासन- पोलिसांकडून असहकार्य, कांबळे कुटूंबिय हताश

बदलापूर : कानपूर आयआयटीत शिक्षण घेत असलेला बदलापूरचा अक्षय कांबळे हा विद्यार्थी अचानक बेपत्ता झालाय. २० दिवस उलटूनही अक्षयचा पत्ता लागलेला नाही. अक्षयच्या वडीलांनी कानपूर पालथ घातलं. पण पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतचं सहकार्य मिळत नसल्याने कांबळे कुटंबिय हताश झालेत. मला माझा मुलगा परत हवाय, अशी विनंती अक्षयच्या वडील करीत असून दोन्ही मुख्यमंत्रयानी यात लक्ष घालावे अशीही मागणीही त्यांनी केलीय.

बदलापूर पूर्वेतील अष्टविनायक सोसायटीत भीमराव कांबळे राहतात. अक्षय हा त्यांचा मोठा मुलगा कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत तिस- या वर्षात शिकत आहे. अक्षयला सुट्टी लागल्याने तो बदलापूरला यायला निघाला. 27 नोव्हेंबरला पुष्पक एक्सप्रेसने घरी येण्याचं आरक्षण त्याने केलं होत, पण तो त्यादिवशी त्या गाडीला बसलाच नाही. त्याने 29 नोव्हेंबरला आईला रात्री 9:30 च्या सुमारास फोन करून सांगितले की, आई मी पुष्पक एक्सप्रेसने निघालोय. अक्षयचा हा शेवटचा फोन त्यानंतर आजवर आजवर अक्षय कुठे आहे ? कोणाकडे आहे ? कुठे गेलाय ? कोणी अपहरण केलंय का ? की कोणी काही घातपात केलाय ? कोणाला कशाचाच पत्ता नाही. अक्षयचे वडीलांनी कानपूर गाठलं.संस्थेच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपास पुढे सरकला नव्हता.अक्षयचे वडीले कानपुर च्या पोलीस ठाण्यात गेले तक्रार नोंदवली पण FIR ची कॉपी नाही दिली. आयआयटी प्रशासन व  पोलिसांकडून कोणतंच सहकार्य मिळत नसल्याचा आरोप  कांबळे कुटूंबियांनी केलाय.

क्षयचे सीमकार्ड  मिळाले  सफाई कर्मचा-यांकडे 
अक्षयकडे दोन फोन होते, एक स्मार्टफोन होता आणि एक साधा कॅालिंग साठीचा फोन होता. त्या फोनवर अक्षय हरवल्यानंतरही कॉल जात होते. कोणीतरी राँग नंबर सांगून कॉल कट करत होते. त्यानंतर त्या कॅम्पसमध्ये झाडू मारणारे जे कर्मचारी होते त्यांना त्याचे सिम सापडले आणि त्यांनी ते सिम आणि दोन्ही फोन अक्षयच्या वडिलांना दिले. सीमकार्ड कच-यात मिळाले असून, त्याचा फोनही त्याने वापरण्यात दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं. सफाई कामगाराकडेच अक्षयचे एटीएम कार्ड आणि ओळखपत्र सापडते कसे, असा प्रश्न त्याच्या वडिलांनी उपस्थित केला. तसेच त्यांनाही पोलिसांनी चौकशी करून सोडून दिल्याचा आरोप त्यांनी केलाय.
—-

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!