ऊर्जा फाऊंडेशनची प्लास्टिक कचरा मुक्तीची वर्षेपूर्ती  : डोंबिवली व ठाण्यातून ४ टन प्लास्टिक जमा

वर्षभरात  केला २२ टन प्लास्टिक कचरा गोळा

ठाणे : उर्जा फाऊंडेशनच्या प्लास्टिक कचरा मुक्त चळवळीला डोंबिवली आणि ठाणेकरांचा वाढता पाठींबा मिळत आहे. आज डोंबिवली व ठाण्यातून ४ टन प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला. वर्षभरात ऊर्जा फाऊंडेशनने तब्बल २२ टन प्लास्टिक कचरा गोळा झालाय. वर्षभरात जमा करून इको फ्रेंडली पध्दतीने पॉलीफ्युल तयार करणा-या रूद्र एन्व्हिरॉन्मेंटल सेाल्युशन्स, जेजुरी येथे पाठविण्यात आला.

गेल्या ३ वर्षांपासून उर्जा फाउंडेशन प्लास्टिक कचरा कमी करणे तसेच वापरलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनःप्रक्रिया करण्यासाठी काम करत आहे. डिसेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत डोंबिवली व ठाणे येथे “माझा प्लास्टिक कचरा ही माझीच जबाबदारी” या अभियाना अंतर्गत १२ सत्रांमध्ये सुमारे २२ टन प्लास्टिकची पुनःप्रक्रिया करण्यात आली. उर्जाच्या फाऊंडेशनच्या१२ व्या माझा प्लास्टिक कचरा चळवळीला रविवारी डोंबिवली आणि ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. या उपक्रमात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, रुद्र एन्व्हरॉन्मेंटल, केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट यांचा मोलाचा सहभाग आहे. या उपक्रमात सर्व नागरिक, स्वयंसेवक तसेच सहभागी कार्यकर्ते, हितचिंतक प्लास्टिक जमा करणारे समाजसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांचे सहभागी झाल्याबद्दल उर्जा फाऊंडेशनने आभार व्यक्त केलय.

 

 

One thought on “ऊर्जा फाऊंडेशनची प्लास्टिक कचरा मुक्तीची वर्षेपूर्ती : डोंबिवली व ठाण्यातून वर्षभरात २२ टन प्लास्टिक कचरा गोळा”
  1. Congratulations for Urja Foundation for completion of 1 year. I also participate in giving individual support by my home collection of plastic as guided by Urja.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *