नववर्षात अयोध्दा ते रामेश्वर राम राज्य रथ यात्रा निघणार
१० लाख सह्यांचे आणि पाच हजार साधुसंतांचे निवेदन राष्ट्रपती- पंतप्रधानांना देणार
मुंबई ( संतोष गायकवाड ) : श्री रामदास मिशन युनिवर्सल सोसायटी यांच्यावतीने १३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१८ दरम्यान राम राज्य रथ यात्रेचे आयोजन करण्यात आलय. श्रीरामदास मिशन युनिवर्सल सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी श्री कृष्णानंद सरस्वती आणि राष्ट्रीय महासचिव श्री शक्ती शांतानंद महर्षी यांच्या नेतृत्वाखाली ही राम राज्य रथ यात्रा आयोजित करण्यात आलीय. रथयात्रेच्या माध्यमातून १० लाख जनतेच्या सहया व पाच हजार साधुसंताचे निवेदन एकत्र करण्यात येणर असून ते देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीना सादर केले जाणार आहे.
अयोध्देपासून रामेश्वरम पर्यंत रामराज्य रथ यात्रा निघणार आहे. ही यात्रा ४१ दिवसात सहा राज्यातून फिरून अंदाजे ६ हजार किमीहून अधिक प्रवास करून रामेश्वरम आणि पुढे कन्याकुमारी पर्यंत जाऊन रामदास आश्रम तिरूअनंतपुरम येथे समाप्त होईल. यात्रेदरम्यान पाच ज्योतिर्लिंग, ३६ तीर्थक्षेत्रे अनेक महासमाधी आणि शेकडो मंदिराची भेट घेतली जाणार आहे. दररोज रथयात्रेचे समापन शोभा यात्रा व त्यानंतर रामराज्य संमेलन होणार आहे. श्री रामरथ हे एक चल मंदिर आहे श्री रामजन्मभूमीमध्ये निर्माण होणा-या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीसारखे बनवले जाईल. यामध्ये श्रीराम सीता हनुमानाच्या मुर्ती व नंदीग्राम मधून आणलेल्या श्रीराम पादुका श्रीलंका येथून आणलेल्या सीता चुडामणी रामेश्वरमहून आणलेला ध्वज आणि मुकाम्बिका देवी मंदिर कोल्लूर कर्नाटक येथील अखंड ज्योती स्थापित असणार आहे. रामराज्याची पुन:स्थापना शैक्षणिक अभ्यासक्रमात रामायण समाविष्ठ करणे राम जन्मभूमीमध्ये श्री राम मंदिराचे निर्माण राष्ट्रीय साप्ताहिक सुट्टीच्या रूपात गुरूवार घोषित करणे विश्व हिंदु दिवस घोषीत करणे आदी या रथ यात्रेमागचा उद्देश आहे.
असे होणार कार्यक्रम
दि ११ व १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ६ ग. दि. माडगुळकर रचीत गीतरामायण कार्यक्रम हिंदीतून हभप अनंतबुवा भोईर व सहकारी सादर करणार आहेत. दि १३ फेब्रुवारीला सकाळी १० ते १२ ३० विशाल संत संमेलन अध्यक्ष प पु १००८ नृत्यगोपालदासजी महाराज, दुपारी ३ ते ५ वाजता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामराज्य रथ यात्रा उद्घाटन सोहळा तर सायंकाळी पाच वाजता अयोध्दा ते फैजाबाद शोभायात्रा निघणार आहे.
अशी झाली रथ यात्रेची सुरूवात
श्रीराम रथ यात्रेची सुरूवात प. पु. जगतगुरू स्वामी सत्यानंद सरस्वती महाराजांनी सन १९९१ मध्ये केली. श्री रामदास मिशनचे ते संस्थापक होते आणि रामजन्मभूमी न्यास मंच व विहिप केंद्रीय मार्गदर्शन मंडळाचे सदस्य होते. त्यांनी सन २००६ मध्ये महासमाधी घेतली. श्री राम रथ यात्रा मागील २७ वर्षापासून केरळ कर्नाटक तामीळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये संपन्न होत आहे.
ही आहेत रथयात्रेची वैशिष्टे
श्रीराम राज्याची पून:स्थापना
शैक्षणिक अभ्यासक्रमात रामायण समाविष्ट करणे
श्रीराम जन्म भूमीमध्ये श्रीराम मंदिराचे निर्माण
राष्ट्रीय साप्ताहिक सुट्टीच्या रूपात गुरूवार घोषित करणे
विश्व हिंदु दिवस घोषित करणे