ठाणे जिल्ह्यातील गरीब, आदिवासी मुलांसाठी सुरु केलेल्या

कौशल्य विकास केंद्रातील १४० मुलांना नोकऱ्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्याथ्यांना प्रमाणपत्र वाटप
ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्रातील १८१ पैकी १४० जणांना नोकऱ्या मिळाल्याने या आर्थिकदृष्ट्या मागस विद्यार्थ्यांच्या चेह- यावर आनंद पसरलाय. शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागातील ही आदिवासी मुले आहेत. उर्वरित ४१ मुलांना नोकरी मिळण्याची प्रक्रिया सुरु आहे.   वर्षभरापूर्वी गावदेवी मैदान येथील मंडईच्या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाने कौशल्य विकास केंद्राची सुरूवात केली. शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले.

कुठे मिळाली नोकरी
इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६० मुलांना एलएंडटी, युरेका फोर्ब्स, सॅमकॉन, सीआयआय; ब्युटीशियन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मुलींना ब्युटी बे, झोरो, पर्ल्स स्पा एंड सलून, फेअर ब्युटी केअर इत्यादी सलून्समध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. नर्सिंग अभ्यासक्रम केलेल्या मुलामुलींना जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ भगत हॉस्पिटल, डॉ बेडेकर हॉस्पिटल, मेट्रो हॉस्पिटल, ठाणे मेडिकल असोसिएशन याठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आहेत. मेकॅनिकल ड्राफ्टसमनच्या २५ विद्यार्थ्यांना अंबरनाथ मॅन्यु.असोसिएशन तर संगणक आणि आयटीचा अभ्यासक्रम केलेल्या २९ विद्यार्थ्यांना डीआयसी तसेच इतरत्र नोकऱ्या मिळाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे.

जानेवारीपासून दुसरी तुकडी
ठाण्यातील गावदेवी मैदान आणि कल्याण येथील केंद्रांमध्ये अनुक्रमे  फादरऍ़ग्नेल  आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे  कौशल्य  विकासासाठी एकूण  बारा  प्रकारचे  विविध  कोर्सेस  शिकविण्यात येतात.  या केंद्राच्या माध्यमातून आठवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रीशिअन,  मॅकॅनिकल  ड्राफ्ट्समन  विथ ऑटो कॅड,  कॉम्प्युटर हार्डवेअर ऍ़ण्डनेटवर्कींग,  इर्न्फोमेशन  टेक्नॉलॉजी,  नर्सिंग असिस्टंट, प्रोफेशनल          ब्युटीफिकेशन असे 6 प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात आलेले आहेत. या कोर्सेसच्या अभ्यासक्रमास महाराष्ट्र स्टेट स्कील डेव्हलपमेंट सोसायटीकडून  मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच फॅशन डिझायनिंग,फिटर,  प्लंबिंग,  हाऊस  किपिंग,  रेफ्रिजरेशन  ऍ़ण्ड एअर कंडीशनिंग मेकॅनिक हे कोर्सेस एप्रिल  पासून सुरु करण्यात आलेत. ठाणे जिल्हा कौशल्य विकास केंद्रामध्ये पहिल्या तुकडीत  181 विद्यार्थीप्रशिक्षण घेत होते आता दुसरी नवी तुकडी जानेवारी २०१८ पासून सुरु होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *