बेस्ट बसमध्ये चोरांचा सुळसुळाट : माजी सैनिकाची दुसऱ्यांदा बॅग कापली
मुंबई : बेस्ट बसमधून प्रवास करीत असतानाच, चोरट्याने एका माजी सैनिकांची बॅग कापल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडला. होसेदार साहेर असे त्या माजी सैनिकांचे नाव असून,  बेस्ट बसमधून प्रवास करीत असतानाच चोरट्याने बॅग कापल्याच्या प्रकाराला दुसऱ्यांदा त्यांना सामोरे जावे लागलंय अशी नाराजी त्यांनी सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना  व्यक्त केली.
बोरिवली येथे राहणारे होसेदार साहेर काही कामानिमित्त फाऊंटंन परिसरात आले होते. तेथून आझाद मैदान येथे येण्यासाठी त्यांनी 103 नंबरची बस पकडली. ते टाइम्स ऑफ इंडिया ऑफिस जवळ उतरले. त्यांच्या खांद्याला काळ्या रंगाची बॅग होती. बॅग सावरत बस मधून उतरत असतानाच चोरट्याने त्यांची बॅग बेल्डच्या साह्याने अथवा धारदार वस्तूने कापली. चोरट्याने बॅगेतील पाकीट चोरले मात्र त्यात काहीच पैसे नव्हते त्यामध्ये घराच्या चावी होती. मागील वेळेसही त्यांच्या पाकिटातून चावीचा जुडगा चोरीला गेला होता असे साहेर यांनी सांगितले. मात्र या विषयी त्यांनी पोलिसात तक्रार केलेेली  नाही. बस मधील गर्दीचा फायदा घेत चोरटयांकडून वृद्ध व्यक्तींना लक्ष्य केले जात आहे याकडे बेस्ट प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे असे त्यानी सांगितले.  साहेर हे कॅन्सग्रस्त आहेत. काही समाज कंटकाकडून त्यांच्या हक्काचे घर बळकावण्यात आलंय. त्या घरासाठी गेल्या 7 वर्षयंपासून ते शासन प्रशासन दरबारी लढा देत आहेत. मात्र त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. ही सर्व कागदपत्र बॅगेत घेऊन ते बाहेर पडले होते असे त्यांनी सांगितले. फिरोजपुर बॉर्डर या 1971 च्या युद्धात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. जम्मू काश्मीर येथील लदाखमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सैन्यदलाकडून 6 पदके मिळाली आहेत.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!