अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा साखरपुडा संपन्न
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा साखरपुडा आज महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये संपन्न झाला. योगायोग म्हणजे आज राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही होता. याच मुहूर्तावर दोघांचाही साखरपुडा झाला.
प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मिताली मुलगी आहे. मिताली फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली दोघांचाही साखरपुडा अगदी खाजगी स्वरूपात पार पडला आहे.