मुंबई, ठाणे परिसरात दाट धुक्यांची चादर
मुंबई : मुंबई ठाणे परिसरात आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत दाट धुकं पसरलं होत. धुक्यांमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. लोकल सेवा उशिराने धावत असल्याने चाकरमन्यांना कामावर पोहचण्यास उशीर झाला.
राज्यात थंडीचा पारा चांगलाच चढू लागला आहे. एकीकडे मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत असताना, दुसरीकडे धुक्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत. फक्त रेल्वेच नाही, तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. हायवेंवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. धुक्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. रस्ते वाहतुक धीम्या गतीने सुरू आहे. धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. धुक्यांमुळे समोरचे काहीच दिसत नव्हते खाडी पट्टीत दाट धुक्यांमुळे मोटरमन अंदाज घेत लोकल चालवीत होते.