भिवंडीत १६ गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी ; कोट्यवधींचा मुद्देमाल जळून खाक
भिवंडी : नजीकच्या चेक पॉंइंट या कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे , या कंपनी मध्ये कागद , फर्निचर सह प्लास्टिकच्या इतर साहित्य बनवीत असून मोठ्या प्रमाणात साठा असल्याने अचानक लागलेल्या या आगीत कंपनीत 40 ते 50 कामगार अडकले होते मात्र एस एल पी सेक्युरिटी चे तब्बल 30 सुरक्षा रक्षकांनी मिळून कंपनीत अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढले, आत्ता पर्यंत 16 गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडनेत. आगीचे स्वरूप भीषण असल्याने भिवंडी, कल्याण, उल्हासनगर ,ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे , या आगीचे कारण अद्याप ही समजू शकले नाही.
मानकोली ओवली परिसरातील चेक पॉइंट या कंपनीमध्ये कागद, फर्निचरसह प्लास्टिकचे साहित्य बनविण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या साठ्याला अचानक आग लागली.आगीने रौद्ररूप धारण केल्याने क्षणार्धात आग सर्वत्र पसरल्याने या आगीच्या कचाट्यात लगतची १६ गोदामे सापडून जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. आगीचे लोळ सर्वदूर पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते .या आगीची माहिती मिळताच प्रांत अधिकारी डॉ. संतोष थिटे ,तहसीलदार शशिकांत गायकवाड ,तलाठी संतोष आगिवले आदींनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत.